Wednesday, April 20, 2011

Fwd: FW: Open Letter to Ram Kadam



---------- Forwarded message ----------
From: sanjiv punalekar <punalekar@hotmail.com>
Date: 2011/4/18
Subject: FW: Open Letter to Ram Kadam
To: 





Date: Sat, 16 Apr 2011 11:10:09 +0530
From: sanjivpunalekar@yahoo.co.in
Subject: Open Letter to Ram Kadam
To: punalekar@hotmail.com

माननीय आमदार राम कदम यांस,

 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश मिळवून देण्याच्या आंदोलनात आपणाला अमाप प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीबद्दल आपले अभिनंदन.  हिंदूंच्या ३३ कोटी देव-देवता आहेत व "जो जे लांछील तो ते लाहो" अशी या एकूण एक देवांची ख्याती आहे. त्यामुळे ज्याला प्रसिद्धीची भूक आहे त्याने तळमळीने त्यासाठी प्रयत्न केले की त्याला प्रसिद्धी मिळायचीच अशी सर्व श्रद्धाळू हिंदूंची ठाम निष्ठा आहे.  पूनम पांडेलादेखील देव पावला आणि तिचे एका रात्रीत   प्रसिद्ध व्हायचे स्वप्न पूर्ण झाले. . त्यामुळे राम कदमांना  मिळणाऱ्या  प्रसिद्धीने  कोणाच्या  पोटात - निदान श्रद्धाळू हिंदूंच्यातरी- कधीही दुखणार नाही  हे निश्चित.  

 

पण ही सर्व प्रसिद्धी होत असताना  महाराष्ट्राच्या  भोळ्या  जनतेत चुकीचा संदेश  जाऊन त्यांची  दिशाभूल  होऊ नये यासाठी हा पत्र प्रपंच. " कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढायला मी तयार आहे" , "कुठल्याही असमानतेच्या आणि विषमतेच्या मी विरुद्ध आहे" , "मशिदीत जाऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम महिला माझ्याकडे आल्या तर त्यांच्यासाठीही मी लढेन" यासारख्या आपल्या जाहीर विधानांना प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरले.  प्रसिद्धीमुळे मते वाढली तर आपणास फायदा आहे पण अशी विधाने गांभीर्याने घेऊन जनता जनार्दन आपल्या दारी येऊन थडकला तर भलताच अनावस्था प्रसंग येईल.  यासाठी आपणास सावध करावे असे मनापासून वाटले. म्हणूनच पत्र लिहायचे धाडस केले. राग मानू नका. 

 

सध्या केंद्र व राज्य सरकारकडून सच्चर आयोग शिफारसींची जोरदार अंमलबजावणी चालू आहे. वर्षाला अडीच लाखाहून कमी उत्पन्न असणारा मुसलमान अथवा ख्रिस्ती  गरीब व त्याला दोन लाखापर्यंत शिष्यवृत्ती मिळते. हिंदू गरिबाला हीच मर्यादा वर्षाला १५ हजार रुपयांची आहे.   म्हणजे कोणी विधवा मराठी बाई धुणी भांडी करून महिन्याला दीड हजार कमावत असली तर ती श्रीमंत आणि तिच्या मुलांचे शिक्षण तिनेच करायचे. ती ज्यांच्या घरी भांडी घासते त्या  मुस्लीम अगर ख्रिस्ती  कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले तर त्या घरच्या मुलांची जबाबदारी सरकारची.   यात आपणास काही अन्याय अगर असमानता दिसते का?

 

ज्या शाळांमध्ये अ-हिंदू विद्यार्थी ७५% असतील अशा सर्व शाळांना ५० लाख रुपये सरसकट देणगीदाखल मिळतात. त्यामुळे सर्व मराठी शाळा - अगदी बालमोहन विद्यामंदिरसकट- भिकेला लागल्या असताना चर्च आणि मदरसा यांच्या इंग्लिश आणि उर्दू शाळांनी हजारो करोडो लुटून नेले. यात आपणास काही अन्याय अगर असमानता दिसते का?

 

सिद्धीविनायक मंदिराच्या पहिल्या मजल्यावर जे कार्यालय आहे तेथे एकदा भेट द्या.  आपणास हज कमिटी कार्यालयात आलो आहोत असा भास होईल एवढे दाढीधारी आणि बुरखाधारी आपणास दिसतील. या मंदिराकडून गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी शेकडो करोडो वाटले जातात त्यापैकी ९०% रक्कम "गरीब मुस्लीम रुग्ण" घेऊन जातात.  हिंदू हात चोळीत बसतात. यात आपणास काही अन्याय अगर असमानता दिसते का?

 

मुसलमान माणसाने जरी मृत्युपत्र करून आपली संपत्ती एखाद्या हिंदूला द्यायचे म्हटले तरी ते बेकायदा ठरते असा कायदा हिंदुस्तानात आहे.  मशिदीकडून हिंदूंना आर्थिक मदत वगैरे मिळेल हे तर स्वप्नातही शक्य नाही. दंगल झाली तर आपले पोलीस मशिदीच्या आत जाऊ शकत नाहीत.  मात्र सिद्धिविनायक मंदिरात दररोज येणाऱ्या हजारो  मुसलमानांना प्रतिबंध नाही. मदत घ्यायची तर देवाला हात जोड असे आपण त्या मुसलमानाला सांगणे हेही बेकायदा आहे.  कमीत कमी सर्व गरीब हिंदू रुग्णांना मदत करून झाली आणि पैसे उरले तरच मुसलमानांना द्या असे म्हणायचीही चोरी आहे. सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही असे जर उद्या  कळले तर आपण तेथे चालून जाल आणि त्यांना प्रवेश मिळवून द्याल यात शंका नाही.  तूर्तास गाभाऱ्याचे राहूच  द्यात . मंदिराच्या पहिल्या मजल्यावर साडी अगर नऊवारी नेसलेल्या बाईला बुरखाधारी बाईच्या अगोदर प्रवेश द्या असा आक्रोश होतो आहे त्याविषयी तरी आपण काही करणार आहात का?

 

मराठी मुसलमान खूप संख्येने आपल्या पक्षाच्या मागे आहेत असे ऐकून आहे.  अधिकृत कागदपत्रांत यांनी आपली भाषा उर्दू लिहिली आहे की मराठी याचे संशोधन केलेत तर डोळे पांढरे होतील.  क्रिकेट सामना हिंदुस्तानने जिंकला की फटाके फोडणारे खूप मुसलमान अलीकडे बघायला मिळतात.  पण पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नकाच शिवाय पाकिस्तान जोवर सर्व-धर्म-समभाव स्वीकारत नाही तोवर हिंदुस्तानने पाकिस्तानशी संबंधच  तोडायला हवेत असे म्हणणारा एकही मुसलमान मला अजून भेटायचा आहे.  आपल्याला कधी भेटला का? अशी मानसिकता असल्यावर मशिदीत प्रवेश मिळवून द्या असे सांगायला मुस्लीम महिला तुमच्याकडे कशाला येतीलपैसे काढून घ्यायला मंदिरात त्यांना प्रवेश आहे त्यावर त्या खुश आहेत.  अंघोळ वगैरे करूनच मंदिरात जायचे असाही नियम काही त्यांच्यासाठी नाही.

 

वर उल्लेख केलेले  मुद्दे म्हणजे  अन्याय व असमानता  याविषयीची केवळ ढोबळ चर्चा आहे.  जास्त खोलात आपल्याला नेऊन आपला मानसिक छळ मी करू इच्छित नाही.  पत्र आपणास लिहिले पण ते  जाहीरपणे यासाठी लिहिले की जनतेनेही सावध राहावे.  उगाच आपल्या दाराशी वरील मुद्दे घेऊन कोणी आले तर वाद व्हायचा.  कुणी पूनम पांडेशी आपली तुलना केली तर आपले मनसैनिक काही असा अपमान सहन करणार नाहीत. त्यातून कोणाला ईजा वगैरे झाली तर परत वैद्यकीय मदत मिळण्याचीही सोय नाही.  होय,  जखमीच्या बायकोला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अगदी गाभाऱ्यापर्यंत जाऊन साकडे घालायची उत्तम सोय आपण करून दिलीत याबद्दल मात्र आपणास धन्यवाद.  

 

मिडीयावाले वाटेल ते छापतात आणि दाखवतात.  ते मनावर नाही घ्यायचे  आणि राम कदमांना नाही त्रास द्यायचा असे निदर्शनाला  आणून देण्यासाठी हा सारा पत्र प्रपंच.  बालमोहन विद्यामंदिर व अन्य  मराठी शाळांतील विद्यार्थ्यांच्या आया आणि गरीब रुग्णांच्या पत्नी यांच्या  सोयीसाठी अंबाबाई मंदिराचा पत्ता व त्यासाठी उपलब्ध ट्रेन व बसेस यांची माहिती आपल्या होर्डिंग वर यापुढे आपण द्यावीत ही नम्र विनंती. 

 

आपला नम्र 

 

संजीव पुनाळेकर  

 




--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors