Sunday, September 29, 2013

दे धक्का

http://www.loksatta.com/arthvrutant-news/the-potential-effects-on-share-market-204613
/

अर्थवृत्तान्त

दे धक्का

the potential effects on share market

मुंबई वृत्तान्त

ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त

नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

मराठवाडा वृत्तान्त

नागपूर/विदर्भ वृत्तान्त

रविवार वृत्तान्त

विदर्भरंग

मोस्ट कमेन्टेड

मोस्ट रीड

मुंबई
Published: Monday, September 23, 2013

२१ ऑगस्टला १७,९०५.९१ या ५२ आठवडय़ांच्या नीचांकावरून १९ सप्टेंबरला २०,६४६.६४ असा तीन वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श करणारा प्रवास.. अवघ्या २१ व्यापार सत्रांचा. एकामागोमाग एक धक्क्यांची मालिका आठवडय़ाभरात बाजाराने अनुभवली. या धक्क्यांची कारणे व त्याचे अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम यांचे हे विश्लेषण..
मागील आठवडय़ात भांडवली बाजाराच्या दृष्टीने चार महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि या चारपकी तीन गोष्टींनी चकवा दिला. आठवडय़ाची सुरुवात औद्योगिक निर्देशांकाने झाली. जुल महिन्याचे औद्योगिक उत्पादनाचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले जाहीर झाले हा पहिला धक्का. ऑगस्टमधील महागाईच्या दराने ६% ची वेस ओलांडली. महागाई वाढेल याची अपेक्षा होतीच. कारण कमालीच्या घटलेल्या रुपयाच्या मूल्याचे पडसाद सरकारच्या नियंत्रणाबाहेरील इंधनाच्या दरात त्वरित उमटतात. या प्रकारच्या इंधनांचा महागाईच्या निर्देशांकावर मोठा प्रभाव असल्याने महागाई दर वर जाणे अपेक्षित होते. तिसरी घटना म्हणजे अमेरिकेत फेडच्या एफओएमसी अर्थात फेडच्या बाजारविषयक समितीची मंगळवार-बुधवारी बठक झाली. जगाचे लक्ष लागून राहिलेल्या फेडच्या या बैठकीने रोखे बाजारात प्रोत्साहनपर खरेदीत कपात न करता दर महिना ८५ अब्ज डॉलरची खरेदी सुरूठेवण्याच्या दिलेल्या कौलाने सगळ्यांना चकित केले. जागतिक बाजारातील द्रवता कमी न होण्याच्या उत्साहाचा परिणाम म्हणून जगातल्या सर्वच बाजारात तेजीला उधाण आले. या तीनही गोष्टींच्या प्रभावाने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आपले पतधोरण ठरविले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर आपल्या पहिल्या पतधोरणात फेडकडून स्फूर्ती घेऊन रेपो दरात कपातीची सार्वत्रिक अपेक्षा असताना राजन यांनी दिल्लीतील अर्थमंत्र्यांना अनुलक्षून धोरणे रिझव्‍‌र्ह बँक आखणार नसल्याचे दाखवून देऊन धक्क्यांच्या मालिकेतला कळसाध्याय गाठला.

उर्वरित वाचण्यासाठी: 2

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors