Saturday, October 15, 2011

Fwd: [Clean India - स्वच्छ भारत] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेत...



---------- Forwarded message ----------
From: Bahujan All India <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/10/15
Subject: [Clean India - स्वच्छ भारत] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेत...
To: Clean India - स्वच्छ भारत <271611512851181@groups.facebook.com>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल...
Bahujan All India 12:47pm Oct 15
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संसदेत सादर केले होते. ते नामंजूर करण्यात आले होते. हिंदू कोड बिलाच्या रूपाने महिलांना स्वतंत्र अधिकार देण्याचा हेतू डॉ. आंबेडकर यांचा होता. हिंदू कोड बिल म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता."बिल नामंजूर झाल्यानंतर बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. महिलांचा अवमान होत असताना त्यांना स्वतंत्र अस्तित्व देण्याचा मानस बाबासाहेबांनी या कायद्यातून मांडला होता. परंतु, त्यावेळी राज्यकर्त्यांनीच त्याला मूठमाती दिली. हिंदू कोड बिलामध्ये घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाहापासून तर शैक्षणिक आणि राजकीय अधिकार होता. बाबासाहेब स्त्रीमुक्तीचे शिल्पकार होते, परंतु त्यांना श्रेय देण्याचा हेतू राजकीय पक्षांचा नव्हता. यामुळेच ते बिल नामंजूर करण्याचे षड्‌यंत्र क्रॉंगेसच्या सरकारने केले होते.मात्र, आज याच बिलातील तरतुदी विविध कायद्याच्या रूपाने अमलात येत आहेत,सर्व समाजातील महिलांना सत्ता व संपत्तीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने वाटा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला त्यावेळी विरोध करण्यात आला. आता सत्ता आपल्याच घरात ठेवून घराणेशाही जपण्यासाठी व ओबीसींची राजकीय ताकद वाढू नये यासाठी महिला आरक्षणाचा विचार पुढे आल्याचे दिसून येत आहे ,डॉ.आंबेडकरांनी मांडलेले हिंदू कायदा विधेयक हे दलित महिलांसाठी नव्हे तर ब्राम्हण, मराठा, ओबीसी आदी सर्वच समाजातील महिलांना सत्ता व संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा म्हणून मांडले होते. समाजातील सर्वच स्त्रियांसाठी डॉ. आंबेडकर लढत होते. स्त्री पुढे गेली तरच देश पुढे जाईल. देशाची प्रगती स्त्रीच्या प्रगतीवर मोजायची असे विचार डॉ. आंबेडकरांचे होते. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांना विरोध करुन हिंदू कोड बिल संमत न करता त्याला विरोध केला गेला आणि आता महिलांचा पुळका दाखविला जात आहे. डॉ.बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध हिंदू संस्कृतीच्या तथाकथित पहारेकार्यानी केला ज्या धर्मात स्त्रीला शूद्र म्हणत होते तिला पुरुषांच्या बरोबरीने बाबासाहेबांनी आणले होते आणी हेच मुळी या हिंदू संस्कृतीच्या रक्षकांना नको होते , या हिंदू कोड बिलामुळे हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होईल किंवा हिंदू धर्मात पेच प्रसंग निर्माण होतील म्हणून केवळ हिंदू कोड बिलाला विरोध करण्यात आला होता , पण आज हेच बिल तुकड्या तुकड्यात पास करून कॉंग्रेस बाबासाहेबांच्या कार्याचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत , माझे बाबासाहेबांच्या विचार वाहकांना आवाहन करतो कि बाबासाहेबांवर झालेल अन्याय हा कधीही विसरू नये आणी त्यांच्या लपलेल्या सर्व विधायक कार्यांची ओळख जगला करून द्या .

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors