Friday, March 30, 2012

माओवाद्यांविरुद्ध लवकरच मोठा संघर्ष?

माओवाद्यांविरुद्ध लवकरच मोठा संघर्ष?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12461999.cms

ऑपरेशन ग्रीन हंट' आता वेगळ्या स्वरूपात 

रविंद्र जुनारकर, चंदपूर 

गडचिरोलीत तीन दिवसापूवीर् झालेल्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेने केंदीय गृहमंत्रालय हादरून गेले असून या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे. 'ऑपरेशन ग्रीन हंट'ला विरोध झाल्याने आता वेगळ्या पद्धतीने नक्षलवाद्यांच्या विरोधात निर्णायक मोहीम राबवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना केंदीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे दंडकारण्य भागात येत्या काही दिवसांत सुरक्षायंत्रणा विरुद माओवादी असा मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत परसोडा गावाजवळ घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटात केंदीय राखीव पोलिस दलाचे बारा जवान शहीद झाले. केंदीय गृहमंत्रालयाने वरिष्ठ पातळीवरून या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर सीआरपीएफचे महासंचालक गडचिरोलीत तळ ठोकून आहेत. येत्या दोन दिवसांत सीआरपीएफचे आणखी काही तज्ज्ञ व वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत दाखल होत आहेत. ते या संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करतील. 

तीन वर्षापूवीर् केंदीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या सात राज्यात 'ग्रीन हंट' मोहीम सुरू केली. या मोहिमेला मानवाधिकारवादी तसेच विविध संघटनांकडून तीव्र विरोध झाला. ग्रीन हंटचे मुख्य लक्ष्य नक्षलवाद्यांचे मुख्यालय असलेले अबूजमाड पहाडाला लक्ष्य करणे होते. ग्रीन हंट मोहीमेला विरोध म्हणून छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या ७० जवानांना नक्षलवाद्यांनी ठार केल्यानंतर ही मोहीम काहीशी थंडावली. मात्र आता हीच मोहीम नाव बदलून नव्याने राबविण्यात येणार आहे. 

गडचिरोलीत पाच हजार सीआरपीएफ जवान तैनात आहेत. गडचिरोली व प्राणहिता या दोन्ही विभागात हे जवान तैनात असून दुर्गम भागातही कॅम्प लावण्यात येणार आहेत. सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी एकमेकांत समन्वय ठेवावा अशा सूचना केंदीय गृहमंत्रालय तसेच आर. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. गृहमंत्री पाटील यांनी बुधवारी गडचिरोलीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेवून भविष्यातील लढाईचे नियोजन तयार केले. पोलिस दलाकडून वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे दुर्घटना घडत असल्याने नक्षलग्रस्त भागात वाहन वापरावर पूर्ण बंदी येण्याचे संकेतही आहेत.सिव्हील अॅक्शन कार्यक्रमामुळे गावागावात सीआरपीएफ विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. याउलट स्थानिक पोलिसांचे जनजागरण मेळावे बंद झाले आहेत. यामुळे विकासकामाचे श्रेयावरून जिल्हा पोलिस व सीआरपीएफमध्ये एकमेकांबदल असहकार्याची भूमिका असल्याचे बोलले जाते. स्फोटके तात्काळ शोधून काढणे, पोलिसांच्या जीवाला धोका निर्माण होवू नये यासाठी आधुनिक तंंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. 

केंद व राज्य सरकारमध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या समन्वयातून नवीन अॅक्शन प्लान तयार करण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात निर्णायक मोहीम राबवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले असून येत्या काही दिवसात सुरक्षा यंत्रणा विरुद्ध माओवादी हा संघर्ष तीव्र होणार आहे.  
 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors