Monday, April 6, 2015

आपण विसरता कामा नये की फॅसिस्ट शक्तींचा पहिला हल्ला जनतेची तर्कशक्ती आणि इतिहासबोध यांवरच असतो. तर्क...

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी निगडित शेकडो संघटना तसेच खाटे बुद्धिजीवी पुराणांत आणि शास्त्रांमध्ये असलेल्या आणि धर्माच्या वेष्टनात गुंडाळून ठेवलेल्या महान भौतिकवादी परंपरा आणि वैज्ञानिक उपलब्धींच्या जागी मिथक, भाकडकथा यांनाच प्राचीन भारताच्या वैज्ञानिक उपलब्धींच्या रूपात प्रस्तुत करण्याच्या आपल्या फॅसिस्ट अजेंड्यावर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आपण विसरता कामा नये की फॅसिस्ट शक्तींचा पहिला हल्ला जनतेची तर्कशक्ती आणि इतिहासबोध यांवरच असतो. तर्कशक्ती आणि इतिहासबोध ह्यांनी रिक्त समाजमानस फॅसिस्ट अजेंड्यावर संघटित करणे नेहमीच सोपे असते. जर्मनीमध्ये हिटलरने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करावयास लावले होते, हा निव्वळ योगायोग नाही. त्याने जर्मन समाजाचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते आणि जर्मनीला जगातील सर्वात शक्तिशाली देश बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. आज आपणसुद्धा चहूबाजूंनी अश्या असंख्य घटना घडताना बघत आहोत.

आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की अंधविश्वास आणि इतिहासोन्मुखता यांच्या वाढत्या ज्वराचा संबंध केवळ आर.एस.एस, भाजपा किंवा त्यांच्या सहयोगी संघटनांपुरता मर्यादित नाही. आज ही एक विश्वव्यापी परिघटना बनली आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक कटृरपंथी आणि पुनरुत्थानवादी शक्ती ह्यामध्ये सहभागी आहेत. ह्या परिघटनेचा वस्तुगत आधार भांडवलशाहीच्या विश्वव्यापी पतनोन्मुखतेमध्ये निहित आहे. आज जागतिक भांडवलशाही तिच्या स्वाभाविक गतीने अशा स्थितीला येऊन पोहोचली आहे जेथून तिच्याकडे जनतेला देण्यासाठी सकारात्मक असे काहीही उरलेले नाही. विज्ञान, कला आणि इतिहास ही क्षेत्रेसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. भांडवलाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी भांडवलशाही स्वयंस्फूर्त गतीने समाजात अंधविश्वास, अंधभक्ति, कूपमंडूकता आणि इतिहासोन्मुखता ह्यासारख्या टाकावू मूल्यांना खतपाणी घालत आहे. अनिर्बंध भांडवली शक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे सर्व प्रकारच्या पुरातन आणि नवनवीन अंध-उन्मादी विचारांना समाजाच्या धमन्यांमध्ये भिनवले जाण्याची! आर.एस.एस आणि भाजप यांचा तथाकथित वैज्ञानिक-सांस्कृतिक अजेंडा प्रत्यक्षात भारतीय भांडवली वर्गाच्या ह्याच अचेतन वस्तुगत आवश्यकतेची सचेतन अभिव्यक्ति आहे.
http://sfuling.com/archives/147
भारतीय विज्ञान परिषद - वैज्ञानिक तर्कपद्धतीचे श्राद्ध घालण्याची तयारी - स्‍फुलिंग
sfuling.com

आपण विसरता कामा नये की फॅसिस्ट शक्तींचा पहिला हल्ला जनतेची तर्कशक्ती आणि इतिहासबोध यांवरच असतो. तर्क...

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors