Friday, April 12, 2013

गुढीपाडवा का साजरा करतो ??

गुढीपाडवा का साजरा करतो ??




शिवशंभूप्रेमिनो आपल्या लाडक्या राज्याचा म्हणजेच शंभूराजे चा हत्येचा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरे करणार आहात का ??

गुढीपाडवा का साजरा करतो ??
कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो . ही माहितीही आई -वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो. त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप. राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी (किमानहिंदुनी) गुढ्या उभा करावयास पाहिजे.अयोध्येत गुढ्या उभा करतात का?अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही . हिंदू धर्मात तांब्या शुभ कोणता? तर सवासा-सरळ . त्यात नागःवेलीचे पाने लावली आहेत . श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत . या धर्माला सवासा तांब्याशुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा ? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हापालथा तांब्या ही शुभ कसा ? केलाय विचार कधी ? ब्राम्हण आम्हांला, गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ? या मध्ये ही एक षडयंत्र आहे कारण याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८वा अध्याय १२५ वा श्लोक).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून बांबुला खोवले. संपूर्ण शिवप्रेमी चा जीव कि प्राण असणारा धाकला धनी शंभूराजे यांच्या शिराची विटंबना करून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहला होता. आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहलेला ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला. ब्राम्हणांनी आनंदाने गुढ्या उभ्या केल्या. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचा राजा मारला गेला होता.नंतर आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितले नाही आम्हीआजही लिंबाचा पाला खातो व भटांच्या सांगण्यावरून गुढयाहीउभा करतो. किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या? आमच्या शोकदिन आमचा सण. मित्रानो गुढीपाडवा साजरा करू नका आपल्या राज्याची हत्या ज्यादिवशी झाली तो दिवस आपला दुखवट्याचा दिवस आहे ............(प्रदीपदादा यांच्या मराठ्यानोजागे व्हा मधून साभार )
संभाजीराजे सर्वांचे लाडके आहेत त्यांची विटंबना करणारी गुडी उभारणार का ??
मी तर कडुनिंबाचा पाला खाऊन तोंड कडू करणार आहे आणि संभाजी महाराजांची विटंबना करणाऱ्याचासमाचार घेण्याची प्रतीज्ञा पण करणार आहे ......आपण काय करणार आहात??

-----------Kunbi Sena Maharashtra Pradesh


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors